Tuesday, June 30, 2009

कोरडा पाऊस

आज अचानक आभाळ भरून आले
विजा कडाडल्या, वा़-याचे थैमान सुरू झाले
मनात विचार आला आज याच्या अंगात काय संचारले?

तसा काही तो सांगून यायचाच नाही
पण तो इतका धसमुसळा कधीच न्हवता
मनात विचार आला आज काही बिनसले का याचे?

झाडाझुडूपांनी शरणागती पत्करली होती
ढगांची त्रेधातिरपीट उडाली होती
मनात विचार आला हे काही तरी वेगळेच आहे?

चहूकडे अंधारून आलेला कुट्ट काळोख
आता बरसेल असे वाटले… पण नाहीच…
मनात विचार आला आपणच जाऊन त्याला समजवावे

मी बाहेर पडलो, त्याच्याकडे पाहीले…
नजरेतूनच व्यक्त झाली त्याची अगतिकता…
मी काहीही न बोलता परतलो, त्याच्या कोरडेपणाने चिंब होऊन

No comments:

Post a Comment